भारतीय किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालचा उपसागरात कमी दाबाचा टप्पा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. आता हे मिचौंग चक्रीवादळ मंगळवारी 5 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशामधील नेल्लोर आणि मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकणार आहे.
🌧 आज हे वादळ उत्तर तामिळनाडूत आले आहे. चक्रीवादळाच्या धोका लक्षात घेऊन रेल्वे विभागाने 118 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच हवामान विभागाने ‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार असे सांगितले आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
☔ मागील आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. आता पुन्हा पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. दरम्यान राज्य सरकारने यापूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.