“वाढेभाऊ”ही परंपरा वंजारी समाजात रद्द भगवानगडाच्या न्यायाचार्ययांचा नव्या विचारला पाठिंबा….


पाथर्डी :महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अत्यंत कष्टाने व मेहनतीने आपल्या सामाजिक व राजकीय अस्तित्वाची स्वतंत्र उभारणी करणारा वंजारी समाज हा ज्ञानाच्या व विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करीत आहे अत्यंत धार्मिक असलेल्या या समाजात काही रुढी व परंपरा व सामाजिक समतोलाच्या दृष्टीने असलेल्या कालबाह्य झालेल्या गोष्टी संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने पाथर्डी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये वंजारी समाजातील वाडे भाऊ ही परंपरा कायमची रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.

श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही एकमुखी मागणी मान्य करण्यात आली. समाजामध्ये लग्न विधी करण्यासाठी फक्त एका आडनावाव्यतिरिक्त बाकी कोणत्याही आडनावाच्या संदर्भात वाढे भाऊ म्हणून नातेसंबंध टाळण्याची परंपरा कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी असा ठराव या वधू वर सूचक कार्यक्रमांमध्ये घेण्यात आला आहे.

पाथर्डी येथे क्षत्रिय वंजारी एकता परिषद च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधू वर सूचक मेळाव्याच्या कार्यक्रमाचे उदघाटन महादेव गडाचे महंत आजिनाथ आंधळे महाराज,राष्ट्रवादीचे नेते प्रताप काका ढाकणे शिवसेना नेते संभाजीराव पालवे, काँग्रेसने नेते दादासाहेब मुंडे, मनसे नेते देविदास खेडकर, बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, राजेंद्र दौंड,माजी सभापती अर्जुन शिरसाट, कार्यक्रमाचे संयोजन करणारे प्रदूषण महामंडळाचे विभागीय आयुक्त दिलीपराव खेडकर, राहुल कारखेले, अमोल गरजे, आपचे नेते व पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष केकान, राणा प्रताप पालवे, भगवान आव्हाड,सतीश खाडे, भगवान दराडे, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे,संजय आव्हाड, विठ्ठलराव तांदले, गोकुळ दौड, बांजरंग घोडके, माणिकराव खेडकर, अशोकराव गर्जे,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाल्यानंतर वंजारी समाजाच्या सामाजिक धार्मिक आर्थिक या विषयावर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.

वंजारी समाज हा ग्रामीण भागात राहणारा मात्र कष्ट करून शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात प्रगती करणारा अत्यंत प्रगल्भ समाज आहे या समाजाला राजकीय व सामाजिक नेतृत्वाबरोबरच धार्मिक व कौटुंबिक क्षेत्रात प्रयत्नपूर्वक काही बदल करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली समाजामध्ये सर्वोच्च धर्मगुरू म्हणून श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री हे आहेत त्यांचा धार्मिक व सामाजिक क्षेत्रात जो विचार असेल तो संपूर्ण समाजामध्ये घेऊन जाण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ही भूमिका मान्यवरांनी मांडल्यानंतर समाजामध्ये विवाहसमारंभामध्ये असणारी वाडे भाऊ ही अडचण सर्वांनी मांडली होती. यावर प्रत्यक्ष महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांच्यासोबत चर्चा करून आंतरजातीय विवाह करण्यापेक्षा आपल्यामध्ये असलेली वाढे भाऊ परंपरा आपण पूर्णपणे नष्ट केली पाहिजे.जेणेकरून या वेगवेगळ्या आडनावामध्ये आपल्याला सोयीनुसार मुले व मुली उपलब्ध होतील जेणेकरून सामाजिक स्वास्थ्य समाजाचे टिकून राहील.या सर्व गोष्टी बरोबरच समाज हा विज्ञाननिष्ठ असल्यामुळे वाडे भाऊ ही संकल्पना रद्द करून रक्तगट अथवा शिक्षण या गोष्टीला अधिक महत्त्व देऊन नात्यांची सोयरीक केली गेली पाहिजे. ही भूमिका मांडली गेली. या सर्व बाबींमध्ये स्वतः न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांनी या परंपरेला छेद देण्याची संकल्पना स्वीकारली असून त्यांनी स्वतःच अशा नवविचाराला पाठिंबा दर्शवत या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना वाढे भाऊ परंपरा यापुढे पाळली जाऊ नये आपल्या मुला-मुलींना योग्य वर वेगवेगळ्या आडनावा मध्ये मिळत असेल तर तो विवाह आपण केला पाहिजे असा ठराव या कार्यक्रमांमध्ये एक मुखी हात वर करून संपन्न झाला. या ऐतिहासिक ठरावामुळे वंजारी समाजातल्या काही परंपरेबाबत आपण विज्ञानवादी होणे आवश्यक होते त्याचा आज प्रारंभ झाला आहे असे मनोगत सर्व व्यासपीठावरील वक्त्यांनी व्यक्त केले आहे.या कार्यक्रमासाठी पाथर्डीसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून वंजारी समाजातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. समाजातल्या बुद्धिजीवी लोकांनी या सर्व प्रस्तावाचे स्वागत केले असून वाडे भाऊ ही परंपरा इथून पुढे नाते जोडताना लक्षात घेऊ नये असे आवाहन सर्व समाज बांधवांनी केले आहे.

प्रास्ताविक संभाजी पालवे यांनी तर सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *