भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय १६ वा.
श्रीराम वनवासाला गेल्यानंतर मागे त्यांचे वडील दशरथाचा मृत्यू झाला. तेव्हा वडिलांच्या मृत्यूची वार्ता आपल्या बंधूंना सांगण्याकरिता भरत रामाचा वनवासात ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी गेले . तेव्हा ज्येष्ठ पुत्र या नात्याने रामाच्या हातून वडिलांचे पिंडदान करणे गरजेचे होते. त्या पिंडदानाकरिता तीळ, तांदूळ इत्यादी सामग्री भरताने आयोध्येतून नेली होती; मात्र त्या सामग्रीने श्रीरामाने पिंड दिला नाही . कारण आपण जे अन्न खातो त्याच सामग्रीचा पिंड पितरांकरता द्यावा हा नियम श्रीरामाने तिथे सांगितला. वनवासात मी अन्न सेवन करत नसून फळे आणि कंदमुळेच खातोय , तेव्हा त्याप्रसंगी तीळ तांदूळ यांना बाजूला सारून आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ फळ आणि कंदमुळे यांचाच पिंड श्रीरामाने दिल्याचा उल्लेख भावार्थ रामायणात सापडतो . महत्वाचा मुद्दा असा की वनवासाच्या काळात श्रीरामाने जो आहार घेतला तो फळे आणि कंदमुळे.